स्वाभिमानी अक्का …

आज ग्रामसभेला सर्वजण जमले, घायपतवाडी म्हणजे ३५ उंबरा च गाव , बरेचसे शेतमजूर आणि स्वतःची शेती असणारे शेतमालक , तसा त्यांना शेतमालक म्हणणे पण चेष्टाच होती , सगळ्यात मोठा शेतकरी म्हणजे म्हैपत आदमाने सहा एकराचा मालक आणि घरी बारा माणस , कस तरी येणार वर्ष काढायचं हेच या वाडी चा नशिबी होत, अक्का वय वर्ष साठीची नाव रुक्मिणी पण अख्खा गाव अक्का च म्हण्याचे. डोंगराचा कुशीत वसलेल्या या गावात अक्काच दोन ऐकरात भाजीपाला करायचा अनेक वर्षांपासूनचा पायंडा, वयाच्या   पन्नाशीत च नवरा साप चाऊन गेल्या पासून अक्का न भाजीपाल्याची गणित  शिकून घेतले, वर्षभर कोणता भाजीपाला पिकव्याचा आणि कशाला  मागणी राहील याचा चांगला अभ्यास केला आणि अनेक वर्षाचा अनुभवातून तिने आर्थिक गणित स्वतः पुरते सोडविले होते . पलीकड्याच डोंगरावर मोहदरी देवीचे मंदिर , गर्द झाडी आणि सरकारी योजनेतून झालेला डांबरी रोड मुळे आणि बाजूलाच असणारे शहरा मुळे पहाटेपासून येणारी अनेक सुशिक्षित लोकांमुळे हा भाग सकाळी चांगलच गजबजलेला होता. खाली गाडी लाऊन तो तीन किलोमीटर चा चढ चढून जाताना चांगलीच दमछाक होत होती पण निर्मळ हवेमुळे लोकांचा चांगलाच व्यायाम होत होता तिथेच अक्का ने एक सपाट जागा पाहून भाजीपाला विकायचा व्यवसाय करता करता दहा वर्ष झाली, अनेक कुटुंब अक्काचा बोलण्याने घरचीच झाली होती.

रोज भाजी विकून मिळणाऱ्या ३००-३५० रुपयात तिचं आणि तिचा मुलाचं चांगले चाललं होत. काही माग पडत नव्हतं पण अडचण देखील येत नव्हती. तशी अक्का खूप मानी  भाजी घेताना दोन रूपे कोणी राहिले तरी ती आग्रहाने परत करत असे.”कष्टा पेक्षा कोणाचं जास्त नको आपल्याला” या विचारांची अक्का आज ग्रामसभेला हजर होती.कोरोना महामारी  हा साथीचा आजार आणि त्यासाठी गावानं काय करायचे यावर चर्चा चालू होती. कोठल्या गावात किती मेले, आज किती लोक वाढले आणि आपल्या नशिबाने आपल्या गावात अजुन ही महामारी आली नाही ही कसी मोहादरी देवीची कृपा यावर प्राथमिक बोलणे झाले. पण. शेजारच्या वाडीत एक माणसाला कोरोना झाला आणि आता सगळं गाव कस तहसीलदार ने सिल केलं .सगळ्यांचा चर्चेतून सरपंचान आपल गावाची वेसबंदी करायची कोणी गावाबाहेर जायचे नाही आणि कोणा पाहुण्यांना गावात प्रवेश नाही याचं फर्मान निघाले.थोडीफार कुजबुज. करत , काळजी करत घराकडे निघाले .कोणाची रोजंदारी बुडतिय, कोणाला रतीबाच दूध देता येत नाही त्यामुळे मोठं नुकसान होतेय..

आणि अक्काचं भाजी विक्री बंद पडलीय.आज गाव बंदी चा दहावा दिवस , गावात आता चलबिचल होऊ लागली. अक्का ची भाजी गावात निम्या भावात पण. कोणी घ्याला तयार नाही, आज तर तिने मेथी जवळपास चा घरात अशीच दिली.आज मात्र अक्का. च आत्मविश्वास डगमगायला  लागला तिने घरातील पैसे पुन्हा मोजले हे पाहून मात्र आक्काच पोरग ओरडल .” अक्के अग कितीदा मोजती पैस , दीडशे च आहेत परत परत मोजून काय वाढणार आहे का? उग आपल काय तरी” अस म्हणत महादू ओसरीवर कपाळाला हात लावून बसला.अक्कानी किराणा किती आहे याचीही चाचपणी केली होती ,अजुन चार ,पाच दिवस तर काही अडचण नव्हती , आणि अगदी लागलाच तर किराणा उधार मिळण्याची तिची पत पण होती. थोडी निर्धास्त होऊन अक्का लवंडली.परस्थिती बदलत चालली होती , गावची गाव बंद होत होती , शेतात काम करण्याचा उत्साह मावळात चालला होता.

आज शेजारचा गावातून मदत म्हणून शिधा पाठविला होता . महादू जोरात ओरडला”आय मी जातो पारावर कोणीतरी शिधा वाटतंय”स्वाभिमानी अक्का जोरात ओरडली ..”

येडा का खुळ आहे तू अर अपने काय भिकारी हाई काय ?

“अक्का च्य इज्जतीचा प्रश्न आहे, बस तिकडं “”तुझ पण काय अक्कर , अग दोन दिवसाचा पण किराणा नाही.. उपाशी मारायचं काय ? तूच्या डोक्यात काही शिरत नाही””आर आपण व्यापारी माणसं, आणि माझ्या खात्यात आहेत की नौशे रुपे  , ते काढून अन् मग पाहू”समोरून प्रल्हाद एक पिशवी चालला होता, “ये महादू अर् आणि की शिधा , जा बिगी बीगी , परत संपलं ,. लई गर्दी झालेय””अर् अक्का नाही म्हणते, काय तिचा डोस्क्यात तेच समजत नाही”ते ऐकायला कोण नव्हतच.महादू गावात जाऊन बॅंकेतून पैस काढून काय किराणा आणायचा याची यादी घेऊन गेला.पडवीत अक्का उदास होऊन खाबाल टेकून बसली होती . दोन तास झालं तरी महादू येत नाही म्हणाला वर ती काळजीत पडली.

लाब वर तिला महादू येताना दिसला तसा तिचा चेहरा फुलला . आलेल्या किराणा सामनातून काय करायचं याचं विचार करीत होती. महादू ला आवडणार भागुल्तल बेसन आणि भात पण करू , लई दिवस झाल भात खाल्लच नाही. महादू च चालणं लैच हळू होत , तिनं जरा डोळा बारीक करून पाहिलं तर त्याचा हातातलं पिशवी रिकामीच वाटत होती तिला जरा काळजीच वाटायला लागली, कधी तो जवळ येतोय याची तिला घाई झाली, ती लबूनाच्र ओरडली “ये महादू अर् काय झालं?”महादू काय न बोलतच पडवीत फतकल मारून बसला, डोळ्यातून पाणी गळत होत , अक्का जवळ जाऊन महादू चा डोक्यावर हात ठेऊन म्हणाली.”काय झालं. महादू.. काई भांडण तंटा झाला की काय “”तुझ्या मूळ गेलो गावात बँक तर बंदच होती पण पोलिसांचे दंडुके खाऊन आलोय, आणि परत त्यांनी शूटिंग बी केलाय , आता सगळ्या वाडीत ची थू होणार अक्का”असं बोलून महादू ओस्क्या बोस्क्या रडू लागला, अक्का चा इभ्रतीला हा प्रथमच एक आघात झाला होता.दोघं आज न जेवताच झोपून गेले… झोपून कसले नुसते पडले होते.. अक्का चा डोक्यातून तो अपमान जात नव्हता… आणि परत उद्याच काय याचा प्रश्न होताच.

सकाळीच परत शिधा वाटप करण्यासाठी गाडी आली , स्वतः अक्का लयानित उभी होती. तिला मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते. ती कसल्या तरी तंद्रीत असताना आवाज आला.”ओ मावशी चला पुढं.. अजुन लई काम आहेत..”मावशीने जड अंतःकरणाने हात पुढे केला , एक पिशवीत बरच जड काहीतरी दिलं गेलं तिचा अनुभवाने हा शिधा आठवड्याचा तरी असेल . तिला एकदम मोकळं वाटलं.ती शिधा घेऊन तिथंच बाजूला बसली, लाईन संपली तसा , कार्यकर्ते निघाले आणि अक्का पुढं येऊन म्हणाली .”पोरांनो कोणी दिलं र हे””मावशी अहो मोहदरी देवी च ट्रस्ट आहे ना ते वाटप करत्यात की , गरीब लोकांसाठी””केवढ्या रूपे च असेल हौ किराणा””मावशी कशाला एवढ्या चौकश्या ? असेल सातशे च “”बर बर अर् हे पण दिवस गेले की देवीला हजाराची पावती फड्याची म्हणून ईचारल”कार्यकर्ते कौतुकाने बघत गाडीत बसले

…आणि ही पावती कस पण करून फाड्याची याचा निश्चय करून अक्का भरभरा घराकड निघाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *